सोशल मीडिया....
आज आपल्याला कनेक्ट करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत फेसबुक व्हॉटसअप,आणखी ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत.फक्त कनेक्ट होण्यासाठी नाही तर बऱ्याच गोष्टीसाठी आपण सोशल मीडिया वापरतो. यावरून सहज गोष्टी एकमेकांना पाठवल्या जातात म्हणजे शेरिंग होतात अगदी सहजपणे आजकाल तर अनेक गोष्टी व्हायरल होतात खर तर व्हायरल होणे हा एक ट्रेंडच आलाय कोणतीही घटना असो ती जगाच्या कोणत्या ठिकाणी घडलेली असली तरी ती व्हायरल होऊन ती जागच्या दुसऱ्या ठिकाणी सहजपणे पोहचते. आपण कोणाशीही सहज बोलू शकतो, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बघू शकतो तेही कुठून ही खरं अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो अगदी एका क्लिकवर खरं तर या सगळ्या गोष्टी खूप छान आहे म्हणजे कोणताही ताणतणाव न घेता कोणतीही वाट न बघता या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. अनेक घटना घडत असतात आपल्या आजूबाजूला आणि त्या अर्ध्या पेक्षा जास्त तर व्हायरलच होताना दिसतात. ती गोष्ट किती महत्वाची आहे आणि त्यामध्ये कीतीपत तथ्य आहे, या गोष्टींचा विचार न करता सरळ पुढे फॉरवर्ड करून टाकतो त्यामुळे काही जणांच आयुष्य सावरते तर कधी काहींच बिघडत. हे सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवारच आहे