शहरांकडील माणसं....

आपल्याकडे गावं आणि शहर असं दोन भागात लोकं विभागलेली आहेत. आणि ही फक्त भागात नाही तर मनाने पण लोकं विभागली आहेत .

गावं आणि शहर  यातली दरी बरीच मोठी आहे. आपण नेहमी च गावाकडच्या गोष्टी गावाकडची माणसं या गोष्टी मध्ये रमून जातो आपल्याला त्या बद्दल आपलेपण पण वाटतो कारण शेवटी गावं ते गावं "गड्या आपला गावं बरा" असं उगीचच थोडी बोलतात . पण या सगळ्यांत शहरात राहणाऱ्या लोकांवर आपलं लक्ष कमीच गेलं त्या विषय आपण आपलेपणाने नाहीच बघत आपला मायेचा साठा सगळा गावांसाठीचं  साठवलेला असतो .हा ही गोष्ट थोडी खटकेल काहीं प्रमाणात का होयना ही गोष्ट पण खरं आहे.

थोडंसना शहरांतल्या बद्दल त्यांच्या गोष्टी समजून घ्याची गरज आहे.शहरतला माणूस म्हणजे हाफ पॅन्ट, स्टायलिश राहणीमान आणि सुशिक्षित बोली असं सगळं उभ राहतं पण तेवढंच असत असं नाही वरकरणी माणूस असा दिसतं असला तरी त्या शहरांच्या कोंडत आणि जीवघेण्या ट्रॅफिक मधला शहरी माणूस गावाकडच्या लोकांनी पाहिलेला नसतो.एखादा शहरांकडून आलेल्या माणसाला गावांत गेल्यावर एक गोष्ट हमखास ऐकायला मिळते ती म्हणजे "तुम्ही मुंबई पुण्याची शहरातली माणसं तुम्हा मोठी माणसं तुमच्या सारखं कुठे आमचा थाट अस बोलून आपण शहर आणि गावं यातली दरी अजून दुरवतोच पण त्याचं बरोबर आपल्याच माणसाला परकेपणची वागणूक देतो गावाकडचे लोकं हे विसरतात की हा शहरवासी होण्याअगोदर तोही आपल्याच बरोबरच राहिलेला वाढलेला आपला माणूस आहे. आपण समोरच्या माणसाला अगदी वेगळेच पाडतो जणू काही शहरातून आलेला माणूस परग्रहातून आलाय असं वागणूक देतो . 

एखाद्या शहरात माणूस जातो गावापासून दूर अनोळखी ठीकाणी कारण एक तर नोकरीसाठी किंवा शिकण्यासाठी ही दोन मुख्य कारण आहेत असं म्हणता येईल नाहीतर कोणाला आवडतं आपलं गावं सोडून असं लांब कुठे तरी परक्या ठिकाणी जाऊन राहायला पण प्रश्न पोटापाण्याचा भविष्याचा असतो त्यासाठी माणसं नाईलाजाने का होयना शहरात जातात तिथल्या गोष्टी आत्मसात करतात पण राहणीमान आणि बोली बदली तरी पण शहरांतली माणसं मनाने आपापल्या गावी गावच्या लोकांनमध्ये असतात. शहरी वातावरणात आणि चार भिंतीत माणूस फक्त शरीरानेचं नाही तर मनाने सुद्धा कोंडलेला असतो. त्याला प्रत्येक वेळी आपल्या गावांबद्दल आणि गावच्याच्या लोकांनबद्दल ओढ ही असतेच, त्यामूळेच गावी गेल्यावर तो फक्तं शहरात राहतो म्हणून परकपणा दाखवण्यापेक्षा त्याला आपले पण जरा दाखवावचं शहरांच्या गर्दी मध्ये आणि स्टायलिश राहणीमान मध्ये तो गावाकडचा साधेपणा गावकी कधी विसरत नाही त्यामुळे जर आपल्या गावावरून एकदा माणूस आला असेल तर तो उत्साहाने आणि आपले पणाने त्याची चोकशी करतो.

 दोन दिवस जरी गावी जाऊन आल ना तरी त्याच्या चेहेऱ्यावर चा आनंद बघण्या सारखं असतो स्वर्गाची सफर केल्याचा  आनंद असतो त्याच्या चेहऱ्यावर ,एक नवी ऊर्जा निर्माण झालेली असते ती ऊर्जा त्याला त्या परक्या शहरात परक्या लोकात जगण्यासाठी मदत करते. शहरातून येणारा प्रत्येक माणसं काय शहरीपणाचा आव आणणारे नसतात किंवा गावकडच्या लोकांना कमी समजणारी नसतात हा अपवाद असू शकतो काही वेळेस. 

त्यामुळेच गावतल्या लोकांनी परकेपना आडमुठेपणा न दाखवता आपलेपणाच्या भावनेने समजून घेतलं तर ही जी दरी आहे शहर आणि गावं अशी ती थोडी का होईना मिटेल एवढं मात्र नक्की.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भाडोत्री

महावारी