महावारी


"महावारी " तसां हा शब्द  फार सोज्वळ वाटतो "पाळी आणि बाहेरची झालेय" याशब्दांन पुढे  हा विषय तसां जुनांचं आहे. या बद्दल खूप बोललं गेलंय आणि जनजागृती ही बऱ्यांपैकी झालेली दिसतेय  "पाळी" बद्दल स्त्रियां  खुलून बोलू लागलेत असं वरकरणी तरी दिसतय पण खरचं आपण पाळी बद्दल ज्या पद्धतीने खुलून बोलतो त्याचं पद्धतीने घरात वागतो का ? सध्या वेगळं बसणे आणि कशाला त्या चार दिवसांत हात न लावणे या गोष्टी फार कमी झालेल्या दिसतात खरं पण त्या पूर्ण पणे बंदच झालेत असंही नाही .कित्येक वेळा घरांमध्ये काही देवाचा कार्यक्रम पूजा असली की बायका  कोणताही विचार न करतां पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या खातात आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करून घेतात. जे लोक मॉडर्न विचारांचा आणि स्वतंत्र स्त्री विचार आणि आजची स्त्री मुक्त स्री यांचा डंका मिरवत असतात अशाच लोकांनच्या घरात हे प्रकार होतात. "एक सुशिक्षित समाज सुसंस्कृत असतो असं नाही" याचं हे उत्तम उदाहरण आहे. या मध्ये ग्रामीण आणि शहरी असा भेदभावचं नाही  कारण दोन्ही ठिकाणी या गोष्टी घडतात .फक्त कित्येक वेळा ग्रामीणचं नावं ठळक पणे दिसतं एवढंच.

खरं तर पाळी येणं नैसर्गिक आहे हे आपल्या प्रत्येकाला माहित आहे. निसर्गाने स्त्रीला दिलेल वरदानच आहे पण ते वरदान नसून एक प्रकारचा  शाप च आहे अशीच काहीशी वागणूक दिली जाते बायकांना मुलींना आणि कोण देतं ही वागणूक तर " "स्रीयांचं" पुरुष तर नंतर येतात यामध्ये नाही पुरुष प्रधान संस्कृती आणि पुरुष प्रधान समाज वगैरे या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पाळीच्या दुसवांस हा स्री कडूनचं केला जातो ही दुर्दैवाची बाब आहे.पाळीमध्ये वेगळं बसणं ही गोष्ट फार पूर्वी पासून चालतं आली आहे पण त्या वेळेची परिस्थिती फार वेगळी होती  पाळीच्या दिवसांत होणाऱ्या असह्य वेदना आणि शाररिक कामाचा ताण यांतून मार्ग म्हणून कढलेला हा एक प्रकारचा उपायच होता असं सर्वसाधारणपणे म्हणता येईल. पण यांमध्ये  "इटाळ" हा शब्द आला आणि पाळीला एक प्रकारचा डागचं लावून गेला तो डाग अजूनही आहे.

आज अनेक घरांत या गोष्टी पाळल्या नाही जातं , पण सगळीकडे हे असचं चित्र आहे असं नाहीए  काही भागात मुलींना वेगळं बसवणं, कपडा वापरणं या गोष्टी होताना दिसतांत आणि अशांच घरांत होतात ज्या घरच्या मुली ह्या सुशिक्षित आणि शिकलेल्या आहेत पण घरच्यांच्या दबवामुळे का होईना त्या गोष्टी पाळल्या जातात.

त्यांमुळे पिढ्यांन पिढ्या या गोष्टी पुढे नेल्या जातांत कितीही जनजागृती झाली "पॅडमन" सारखे चित्रपट निघाले तरी त्याचा किती परिणाम झालाय हा एक प्रश्नच आहे. पाळी बद्दल जेवढं बोलू - समजू तेवढं कमीच आहे कारण हा विषय अधिक खोल जातो त्या बद्दलचा नवीन वाद प्रतिवाद आणि प्रश्न उत्तरे निर्माण होतील.

निसर्गाने नेमका काय विचार करून स्त्रीला ही गोष्ट दिली आहे याचं उत्तर शोधता नाही येणार आपल्याला पण हा पाळी म्हणजे शाप नसून एक सुंदर गोष्ट आहे पण त्या बद्दलच्या गैरसमजांमुळे त्यातला चांगलेपणा हरवून बसलांय जणू. काही ठिकाणी बदल झालाय खरं पण अजूनही बहुतांक्ष ठिकाणी ती बाहेरची आहे आणि हे कटू सत्य आपल्या आजूबाजूला दिसतं. 

पाळी बद्दल अजून खुलून बोलणे ,त्या बद्दलचा गैरसमज दूर करून तिच्या कडे एक वैज्ञानिक दृष्टिकोनांतून बघने, या सगळ्या गोष्टी आपण "स्री "म्हणून पुढाकार घेऊन करायला पाहिजे याची सुरुवात जर आपल्या घरांतून केली तर येणांऱ्या अनेक पिढ्यांना या विषयांवर बदलेला दृष्टिकोन मिळेल आणि तो पुढे रुजवला आणि वाढवला जाईल अशी आशा धरायला काही हरकत नाही.



Comments

Popular posts from this blog

भाडोत्री

शहरांकडील माणसं....