भाडोत्री

 आपण नेहमी ऐकतो वाचतो की आई होणे किंवा मुलगी होणे सोपं नसतं तसचं काहीसं भाडोत्री होणं पण सोपं नसतं असचं   बोलतां येईल तर चाळीत किंवा बिल्डिंग मध्ये कोण नवीन भाडोत्री आले की आपण आपल्या घरातून आपल्या बाल्कनी मधून अगदी आरामात त्यांची समान उतरवताना होणारी धरपकड बघत बसतो खरं तरं असं पहिल्या ने समोरच्याला किती अवघड होतं असेल याचा विचार आपण करत नाही काही लोक तरं काय काय सामना आहे फ्रिज वाॅशिन मशिन आणि हे आहे का ते नाही का याची पाहणीच करत बसतात मदत तरं दूरच पण समोरच्याची गंमत बघायची असो ज्याची त्याची जगण्याची तऱ्हा काहींना दुसऱ्यांची गंमत बघण्यात फार आहेस वाटतं. तरं पुढे नवीन घरात भाडोत्री येतात सामान उतण्याचा संघर्ष झाल्यावर मग त्या नवीन घरात कुठलं सामान कुठे लावयचा, टीव्ही कुठे मांडायचा, भांड्याच कपाटं‌ कपड्याच कपाट कुठे ठेवयचं असा एक ना अनेक गोष्टीची मांडा मांड होते . खरं तर नव्याने पुन्हा संसार सुरू करायचा. या सगळ्या गोष्टी नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे "शेजार " एक चांगला शेजार असणे म्हणजे "जॅकपोट"सारखं  असतं तो जर लागला तर तुमची पाची बोटं तुपात असल्या सारखंच आहे नवीन कुठे ही राहायला गेल्यावर आपल्याला शेजार कसा मिळतोय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात चांगला शेजार असणे फार गरजेचे असते पण सध्या फ्लॅट सिस्टीम मध्ये शेजार धर्म थोडा ब्लरच होत चाललाय चाळीत अजून तरी तो धर्म  निभवला जातो.तर या नंतर नवीन जाग्यावर आल्यावर पुन्हा फक्त सामनच नाही तर नव्याने सगळ्यांची ओळख करून घ्या त्यात काही लोकं आणि इथे ते किती वर्षापासून राहतात आणि आम्ही इथले किती जूने रहिवाशी आहोत या गोष्टी सांगण्यातच धन्यता मानतात.खर तर सामान लावणे नव्याने ओळखी करून घेणे या सगळ्या गोष्टी काय फार अवघड आहेत असं नाही अनेक लोकं भाड्याने राहतात राहत आलेत मुळांत एखाद्या जागेवर घरात ज्याचं ते घर अगदी आपल्या स्वतःच्या घराप्रमाणे त्या घरातला प्रत्येक कोपरा सजवतात. माहित असतं प्रत्येक भाडोत्र्यांना की एक ना एक दिवस आपल्याला हे घरं सोडायचं आहे .पण तरी सुद्धा लोक अनेक आठवणी तयार होतात त्याच भाड्याच्या घरात घरं आपलं असो की भाड्याचं

लोकं अनेक ऊन पाऊसाचे क्षण त्या घरात अनुभवलेले असतात. कित्येक लोकं तर लहानाचे मोठे. भाडयाच्याच घरात होतात. आणि एक दिवस आपण पुन्हा आपलं सामन बांधायला घेतो नवीन घरात जायला तो भाडोत्री तयार होतो किती साऱ्या आठवणी असतात घराबद्दल आपण राहतं असलेल्या त्या परिसराबद्दल आणि एक दिवस अचानक या सगळ्या गोष्टी सोडून जायचं दुसरी कडे राहायला खरचं खूप अवघड गोष्ट आहे भाडोत्री होणं. कारण माणसं फक्त सामानच

नाही तर अनेक आठवणी घेऊन जातात काही ठेऊन जातात. नव्याने सगळ्या गोष्टी पुन्हा ऊभाऱ्यला कसं असतं काहीचं आयुष्य एका घरात राहायचं त्या घराला त्या परिसराला अगदी आपलस करायचं आणि एक दिवस सगळं सोडून पुढच्या प्रवासाला म्हणजे नवीन घरात नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज होयच.काही लोकांचा भाडोत्रीकडे बघण्याचा दृष्टी कोण फार वेगळा असतो भाडोत्री म्हणजे कोण तर चार दिवसाच्या पाहुणे त्यानं काय काही दिवसा इथे तर काही दिवस तिथे असं भटकत असतात पण कही ना काही परिस्थिती मुळे लोकं अशा प्रकारे  राहतात आपण प्रत्येकाला एकाच दृष्टी कोनाने एकच तराजू मध्ये मापून नाही चालणार.

कारण काही लोकं भाड्याने राहत असले तरी ते दुसऱ्यांच्या मनांत कायमचं घरं करून राहतात आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपल्या आजूबाजूला किंवा आपण स्वःता ही अशा प्रकारचा अनुभव घेतला असेलच कधीना कधी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक भाडोत्री असतो जो कायमचा आपल्या मनात घरं करून राहिलेला असतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शहरांकडील माणसं....

महावारी