Posts

Showing posts from July, 2021

सोशल मीडिया....

Image
आज आपल्याला कनेक्ट करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत फेसबुक व्हॉटसअप,आणखी ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत.फक्त कनेक्ट होण्यासाठी नाही तर बऱ्याच गोष्टीसाठी आपण सोशल मीडिया वापरतो. यावरून सहज गोष्टी एकमेकांना पाठवल्या जातात म्हणजे शेरिंग होतात अगदी सहजपणे आजकाल तर अनेक गोष्टी व्हायरल होतात खर तर व्हायरल होणे हा एक ट्रेंडच आलाय कोणतीही घटना असो ती जगाच्या कोणत्या ठिकाणी घडलेली असली तरी ती व्हायरल होऊन ती जागच्या दुसऱ्या ठिकाणी सहजपणे पोहचते. आपण कोणाशीही सहज बोलू शकतो, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बघू शकतो तेही कुठून ही खरं अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो अगदी एका क्लिकवर खरं तर या सगळ्या गोष्टी खूप छान आहे म्हणजे कोणताही ताणतणाव न घेता कोणतीही वाट न बघता या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. अनेक घटना घडत असतात आपल्या आजूबाजूला आणि त्या अर्ध्या पेक्षा जास्त तर व्हायरलच होताना दिसतात. ती गोष्ट किती महत्वाची आहे आणि त्यामध्ये कीतीपत तथ्य आहे, या गोष्टींचा विचार न करता सरळ पुढे फॉरवर्ड करून टाकतो त्यामुळे काही जणांच आयुष्य सावरते तर कधी काहींच बिघडत.  हे सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवारच आहे

परंपरेला छेद देतांना

Image
 आपला देश समृद्ध आहे तो इथल्या इतिहास,सण, समारंभ, आणि अनेक विविध परंपरेमुळे भारतात अनेक रिती-रिवाज पाळल्या जातात. प्रत्येक राज्यात आपले सणवार अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पाळले जातात त्याचे महत्त्व देखील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे ,आपल्या प्रथा परंपरेला आजही तितकचं महत्व दिलं जातं. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी काही वेळेस आपण आपल्या परंपरा रुढी आणि सणवार  संस्कृती यांनाच नावं ठेवण्यात धन्यता मानतो. "हे व्रत वैकल्या सणवार रिती भाती या जुनाट आहेत या सगळ्यांचे आता काय महत्व आणि आम्ही का मानायच्या असे बोलणांरे लोक आहेत आणि मानणांरे सुद्धा. अनिष्ट रुढी आणि परंपरेला विरोध झालाचं पाहिजे पण यांमध्ये आपण आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेलाच छेद देतं नाही ना याचा पण विचार करावाच.  अनेक पुढारलेल्या घरात बहुतेक सणवांर साजरे करणे बंदचं झालाय जणू उपवास व्रत वैकल्या करणं म्हणजे आपण मांगास जुनाट विचारसरणीचे लोक असा समजंच झालांय.ही परिस्थिती सगळीकडे  सारखीच आहे असं नाही पण या गोष्टींची सुरुवात झाली आहे हे नक्की . अनेक प्रश्न विचारले जातांत या सणवांरा विषयी जसे की वटपौर्णिमेला स्त्रीनेचं का उ