मोटिवेशन होण्याचं व्यसन


आज काल अगदी कळायला लागलेल्या लहान मुलांनंपासून ते  आयुष्यांच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या लोकांना ही मानसिक तणांने ग्रासलेलं पहिला मिळतं कारणं अनेक आहेत बदलेली जीवनशैली हे एक मुख्य कारण आहे. आपली लाईफस्टाईल इतकी किचकट करून ठेवली ना की आपल्या जगण्यांची तऱ्हाचं बदलून गेलेेय.  

अती महत्त्वाकांक्षा आणि तुलनांत्मक जीवन आपण जगतोय बरच काही मिळवायचं आहे प्रत्येकाला पण आपल्याला जे मिळवायचं आहे त्याची खरचं गरज आहे का ? की उगीच समोरच्या माणसांकडे ते आहे आणि आपल्याकडे त्या गोष्टी नाहीत म्हणून आपण त्याच्या मागे तर लागलो नाही ना याचा विचार करावाच .या सगळ्या मध्ये आपण आपलचं आयुष्य नको त्या वाळणांवर आणून ठेवतो स्पर्धा ही असावी स्पर्धक ही असांवा त्या शिवाय प्रगती होतं नाही हे खरं आहे पण आपल्याला काय पाहिजे आणि आपली गरज काय आहे याचा सारासार विचार नं करता आपण त्या गोष्टींच्या मागे लागतो मग ती गोष्ट नाही मिळाली तर आपल्याला त्रास होतो आपण मानसिक ताण घेतो मग त्यांतून बाहेर पडण्यांसाठी आपल्याला गरज भासते ती मोटिवेशन प्रोत्साहित होण्यांची आपण अनेक व्हिडिओ पाहतो आणि अनेक थोरां मोठ्यांचे विचार आपल्याला आपला संघर्ष करायला मदत करतांत. मोटिवेशन व्हिडिओ पाहणे आणि आपल्याला प्रोत्साहित करणांऱ्या गोष्टी करणे चांगलेच आहे पण आपण त्या गोष्टीच्या आहारी तर नाही ना गेलो या बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण कोणत्याही गोष्टींचा अतिरेक होणे हे वाईटचं आणि त्याचे दुष्यपरिणामही होऊ शकतात मग ती गोष्ट चांगली असो की वाईट .

आज एका क्लिक वर किती तरी मोटिवेशन व्हिडिओ उपलब्ध आहेत मोटिवेशन व्हिडिओला लाखो लोक पाहतात आज लाखो लोकांना अशा प्रकारच्या मोटिवेशनची गरज आहे एवढे लोकं आज मानसिक ताणांतून जातं आहेत आणि हे चित्र फार काही दिलासादायक नाही हे नक्कीच. अगदी सुरुवांतीला लोकं या संघर्षाच्या काहण्या उत्साहाने पहायचे आता आपल्याला त्या गोष्टीची इतकी सवय झाली कि काही प्रोब्लेम येऊ दे आपण टेन्शन मध्ये येतो आणि मानसिक तणांतून बाहेर पडण्यांसाठी मोटिवेशनची गरज पडते. यातल्या काही स्टोरी काही लोकांच्या आयुष्यांवर खरचं परिणाम करतात आणि त्या मानसिक ताणांतून बाहेर पडून एक यशस्वी आयुष्य जगायला मदत करतात पण फार थोड्या लोकांनबाबत असं घडतं बाकी बहुतांश लोक हे या मोटिवेशन गोष्टी फक्त तात्पुरतं बरं वाटावं म्हणुन बघतात आणि सोडून देतात त्याचं त्यांच्या आयुष्यांवर किती चांगला ‌परिणाम होतो आणि त्यांतून ते खरचं काही शिकलेत का हा तर संशोधनांचा विषय होऊ शकतो.

संघर्ष हा प्रत्येकांचा वेगवेगळा असतो आणि त्या संघर्षाची गोष्ट ही वेगवेगळी असते. हे करताना आपल्याला कधी चढ कधी उतार हा लागतोच आणि त्यांतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रोत्सहित आणि एक पॉसिटीव ऊर्जा देणाऱ्या गोष्टीची गरज पडते कारण त्यांचं गोष्टी आपल्या मनांला उभारी देतात आणि तणांवातून बाहेर पडण्यांसाठी मदत करतं असतांत पण आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी अशा मोटिवेशन गोष्टींची गरज लागतं असेल आणि त्यााचीचं आपल्याला सवय लागली तर तिथे थोडा विचार करण्यांची खरचं गरज आहे कारण सवयीचं रूपांतर कधी व्यसनांत होतं हे आपल्याला ही कळतं नाही त्यामुळेच मोटिवेशन व्हिडिओ पाहातांना आपल्याला त्याची गरज आहे की व्यसन याची एकदा आपल्या मनांला चाचपणी जरूर करून घ्यावी. 

Comments

Popular posts from this blog

भाडोत्री

शहरांकडील माणसं....

महावारी