सोशल मीडिया....



आज आपल्याला कनेक्ट करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत फेसबुक व्हॉटसअप,आणखी ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत.फक्त कनेक्ट होण्यासाठी नाही तर बऱ्याच गोष्टीसाठी आपण सोशल मीडिया वापरतो. यावरून सहज गोष्टी एकमेकांना पाठवल्या जातात म्हणजे शेरिंग होतात अगदी सहजपणे आजकाल तर अनेक गोष्टी व्हायरल होतात खर तर व्हायरल होणे हा एक ट्रेंडच आलाय कोणतीही घटना असो ती जगाच्या कोणत्या ठिकाणी घडलेली असली तरी ती व्हायरल होऊन ती जागच्या दुसऱ्या ठिकाणी सहजपणे पोहचते. आपण कोणाशीही सहज बोलू शकतो, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बघू शकतो तेही कुठून ही खरं अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो अगदी एका क्लिकवर खरं तर या सगळ्या गोष्टी खूप छान आहे म्हणजे कोणताही ताणतणाव न घेता कोणतीही वाट न बघता या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात.

अनेक घटना घडत असतात आपल्या आजूबाजूला आणि त्या अर्ध्या पेक्षा जास्त तर व्हायरलच होताना दिसतात. ती गोष्ट किती महत्वाची आहे आणि त्यामध्ये कीतीपत तथ्य आहे, या गोष्टींचा विचार न करता सरळ पुढे फॉरवर्ड करून टाकतो त्यामुळे काही जणांच आयुष्य सावरते तर कधी काहींच बिघडत. 

हे सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवारच आहे त्याचा वापर कसाही करा तुकडा हा पडलाचं जातो आणि परिणाम हे चांगले आणि वाईट दोन्ही होतात. त्यामुळे त्याचा वापर हा जपून  आणि आपली विवेक बुध्द वापरून केला पाहिजे ही सत्यता नाकारता येणार नाही.सध्या या सोशल मीडियामुळे मानवी जीवन सुखकर झालं आहे पण तिढापण तेवढाच वाढलाय आपलं वैयक्तिक आयुष्य जणू आपण सार्वजनिक करून ठेवलय.

काहीजणांच्या बाबत तर हे सोशल मीडिया म्हणजे माकडाच्या हाती कोलिद दिल्याप्रमाणे आहे. या गोष्टीवरून वाद ही होऊ शकतो. पण खरचं डोळसपणे बघताना याची जाणीव नक्की होते. आपण नक्की कोणती गोष्ट व्हायरल करतोय आणि त्यातून आपले, समाजाचे काही नुकसान तर नाही ना होणार त्याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो  याचा विचार न करता अनेक गोष्टी या सोशल मीडियावर टाकल्या जातात.

सध्या याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटकच झाला आहे पण यातून नेमके काय सध्या होतय हे  ज्याने त्याने ठरवाव.हो पण सोशल मीडिया ही काही निसर्गनिर्मित गोष्ट नाही ती निसर्गाने नाही बनवली तर ती मानवनिर्मित आहेत या सगळ्याचा रिमोट कंट्रोल कोणां तरी व्यक्तीच्या हातात आहे आणि त्यागोष्टी कधीही  बंद होऊन पूर्णपणे नष्ट ही होऊ शकतात. त्यामुळे आपण या सोशल मीडियाच्या जगात किती वाहवत जायचं ह्याचा विचार नक्की करावा.



Comments

Popular posts from this blog

भाडोत्री

शहरांकडील माणसं....

महावारी