Posts

Showing posts from June, 2021

महावारी

Image
"महावारी " तसां हा शब्द  फार सोज्वळ वाटतो "पाळी आणि बाहेरची झालेय" याशब्दांन पुढे  हा विषय तसां जुनांचं आहे. या बद्दल खूप बोललं गेलंय आणि जनजागृती ही बऱ्यांपैकी झालेली दिसतेय  "पाळी" बद्दल स्त्रियां  खुलून बोलू लागलेत असं वरकरणी तरी दिसतय पण खरचं आपण पाळी बद्दल ज्या पद्धतीने खुलून बोलतो त्याचं पद्धतीने घरात वागतो का ? सध्या वेगळं बसणे आणि कशाला त्या चार दिवसांत हात न लावणे या गोष्टी फार कमी झालेल्या दिसतात खरं पण त्या पूर्ण पणे बंदच झालेत असंही नाही .कित्येक वेळा घरांमध्ये काही देवाचा कार्यक्रम पूजा असली की बायका  कोणताही विचार न करतां पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या खातात आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करून घेतात. जे लोक मॉडर्न विचारांचा आणि स्वतंत्र स्त्री विचार आणि आजची स्त्री मुक्त स्री यांचा डंका मिरवत असतात अशाच लोकांनच्या घरात हे प्रकार होतात. "एक सुशिक्षित समाज सुसंस्कृत असतो असं नाही" याचं हे उत्तम उदाहरण आहे. या मध्ये ग्रामीण आणि शहरी असा भेदभावचं नाही  कारण दोन्ही ठिकाणी या गोष्टी घडतात .फक्त कित्येक वेळा ग्रामीणचं नावं ठळक पणे दिसतं एवढंच. ख

मोटिवेशन होण्याचं व्यसन

Image
आज काल अगदी कळायला लागलेल्या लहान मुलांनंपासून ते  आयुष्यांच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या लोकांना ही मानसिक तणांने ग्रासलेलं पहिला मिळतं कारणं अनेक आहेत बदलेली जीवनशैली हे एक मुख्य कारण आहे. आपली लाईफस्टाईल इतकी किचकट करून ठेवली ना की आपल्या जगण्यांची तऱ्हाचं बदलून गेलेेय.   अती महत्त्वाकांक्षा आणि तुलनांत्मक जीवन आपण जगतोय बरच काही मिळवायचं आहे प्रत्येकाला पण आपल्याला जे मिळवायचं आहे त्याची खरचं गरज आहे का ? की उगीच समोरच्या माणसांकडे ते आहे आणि आपल्याकडे त्या गोष्टी नाहीत म्हणून आपण त्याच्या मागे तर लागलो नाही ना याचा विचार करावाच .या सगळ्या मध्ये आपण आपलचं आयुष्य नको त्या वाळणांवर आणून ठेवतो स्पर्धा ही असावी स्पर्धक ही असांवा त्या शिवाय प्रगती होतं नाही हे खरं आहे पण आपल्याला काय पाहिजे आणि आपली गरज काय आहे याचा सारासार विचार नं करता आपण त्या गोष्टींच्या मागे लागतो मग ती गोष्ट नाही मिळाली तर आपल्याला त्रास होतो आपण मानसिक ताण घेतो मग त्यांतून बाहेर पडण्यांसाठी आपल्याला गरज भासते ती मोटिवेशन प्रोत्साहित होण्यांची आपण अनेक व्हिडिओ पाहतो आणि अनेक थोरां मोठ्यांचे विचार आपल्याला आपला स

अपयशांतून जातांना

 "अपयश ही यशांची पहिली पायरी आहे" असं नेहमीच बोललं जातं आणि ते खरं पण आहे यश मिळवण्यासाठी आधी अपयशाच्या धगीतून जावचं लागतं, त्यानंतर आपल्याला यशाचा गारवा अनुभवता येतो.हे वाचायला ऐकायला जेवढं छान आणि मनांला उभारी देणारं असलं ना तरी पण येणारं अपयश आणि त्यातून जातांना होणारा त्रास खरचं खूप परीक्षा बघणारा असतो. आपल्या सगळ्यानचं कधी ना कधी अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं. कधी परीक्षेत, कधी नोकरीत तर कधी नात्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी मिळवताना यश नाही मिळतं. मग सुरू होतो तो अपयशांचा प्रवास, खरं तर हाच प्रवास आपल्याला यशांच्या शिखरांवर घेऊन जातो.पण कित्येकदा आपल्या आजूबाजूला आपण जीवनांची सगळीचं लढाई हरून बसलोय याची तीव्रतेने जाणीव करून देणांरी लोकं असतात.समजून घेणांरे आणि समजणारे फार कमी लोकं अशा वेळी भेटतांत. एक ना अनेक सल्लागार निर्माण होतात.अनेक सल्ले मसले दिले जातात आणि दुर्दैवाने आपल्याला त्यावेळी उत्तर ही नाही देतां येत. खरं तर ," शिकवून गेलेलं अपयश हे यशांचांच एक भाग असतो" पण याची जाणीव कमी आणि आपणच कसे कमी पडलो आपले प्रयत्न किती कमी पडलो याचीचं जाणीव जास्त करून दिल

शहरांकडील माणसं....

आपल्याकडे गावं आणि शहर असं दोन भागात लोकं विभागलेली आहेत. आणि ही फक्त भागात नाही तर मनाने पण लोकं विभागली आहेत . गावं आणि शहर  यातली दरी बरीच मोठी आहे. आपण नेहमी च गावाकडच्या गोष्टी गावाकडची माणसं या गोष्टी मध्ये रमून जातो आपल्याला त्या बद्दल आपलेपण पण वाटतो कारण शेवटी गावं ते गावं "गड्या आपला गावं बरा" असं उगीचच थोडी बोलतात . पण या सगळ्यांत शहरात राहणाऱ्या लोकांवर आपलं लक्ष कमीच गेलं त्या विषय आपण आपलेपणाने नाहीच बघत आपला मायेचा साठा सगळा गावांसाठीचं  साठवलेला असतो .हा ही गोष्ट थोडी खटकेल काहीं प्रमाणात का होयना ही गोष्ट पण खरं आहे. थोडंसना शहरांतल्या बद्दल त्यांच्या गोष्टी समजून घ्याची गरज आहे.शहरतला माणूस म्हणजे हाफ पॅन्ट, स्टायलिश राहणीमान आणि सुशिक्षित बोली असं सगळं उभ राहतं पण तेवढंच असत असं नाही वरकरणी माणूस असा दिसतं असला तरी त्या शहरांच्या कोंडत आणि जीवघेण्या ट्रॅफिक मधला शहरी माणूस गावाकडच्या लोकांनी पाहिलेला नसतो.एखादा शहरांकडून आलेल्या माणसाला गावांत गेल्यावर एक गोष्ट हमखास ऐकायला मिळते ती म्हणजे "तुम्ही मुंबई पुण्याची शहरातली माणसं तुम्हा मोठी माणसं तुमच्या

भाडोत्री

 आपण नेहमी ऐकतो वाचतो की आई होणे किंवा मुलगी होणे सोपं नसतं तसचं काहीसं भाडोत्री होणं पण सोपं नसतं असचं   बोलतां येईल तर चाळीत किंवा बिल्डिंग मध्ये कोण नवीन भाडोत्री आले की आपण आपल्या घरातून आपल्या बाल्कनी मधून अगदी आरामात त्यांची समान उतरवताना होणारी धरपकड बघत बसतो खरं तरं असं पहिल्या ने समोरच्याला किती अवघड होतं असेल याचा विचार आपण करत नाही काही लोक तरं काय काय सामना आहे फ्रिज वाॅशिन मशिन आणि हे आहे का ते नाही का याची पाहणीच करत बसतात मदत तरं दूरच पण समोरच्याची गंमत बघायची असो ज्याची त्याची जगण्याची तऱ्हा काहींना दुसऱ्यांची गंमत बघण्यात फार आहेस वाटतं. तरं पुढे नवीन घरात भाडोत्री येतात सामान उतण्याचा संघर्ष झाल्यावर मग त्या नवीन घरात कुठलं सामान कुठे लावयचा, टीव्ही कुठे मांडायचा, भांड्याच कपाटं‌ कपड्याच कपाट कुठे ठेवयचं असा एक ना अनेक गोष्टीची मांडा मांड होते . खरं तर नव्याने पुन्हा संसार सुरू करायचा. या सगळ्या गोष्टी नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे "शेजार " एक चांगला शेजार असणे म्हणजे "जॅकपोट"सारखं  असतं तो जर लागला तर तुमची पाची बोटं तुपात असल्या सारखंच आहे नवीन