अपयशांतून जातांना

 "अपयश ही यशांची पहिली पायरी आहे" असं नेहमीच बोललं जातं आणि ते खरं पण आहे यश मिळवण्यासाठी आधी अपयशाच्या धगीतून जावचं लागतं, त्यानंतर आपल्याला यशाचा गारवा अनुभवता येतो.हे वाचायला ऐकायला जेवढं छान आणि मनांला उभारी देणारं असलं ना तरी पण येणारं अपयश

आणि त्यातून जातांना होणारा त्रास खरचं खूप परीक्षा बघणारा असतो. आपल्या सगळ्यानचं कधी ना कधी अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं. कधी परीक्षेत, कधी नोकरीत तर कधी नात्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी मिळवताना यश नाही मिळतं.

मग सुरू होतो तो अपयशांचा प्रवास, खरं तर हाच प्रवास आपल्याला यशांच्या शिखरांवर घेऊन जातो.पण कित्येकदा आपल्या आजूबाजूला आपण जीवनांची सगळीचं लढाई हरून बसलोय याची तीव्रतेने जाणीव करून देणांरी लोकं असतात.समजून घेणांरे आणि समजणारे फार कमी लोकं अशा वेळी भेटतांत. एक ना अनेक सल्लागार निर्माण होतात.अनेक सल्ले मसले दिले जातात आणि दुर्दैवाने आपल्याला त्यावेळी उत्तर ही नाही देतां येत.

खरं तर ," शिकवून गेलेलं अपयश हे यशांचांच एक भाग असतो" पण याची जाणीव कमी आणि आपणच कसे कमी पडलो आपले प्रयत्न किती कमी पडलो याचीचं जाणीव जास्त करून दिली जाते. प्रत्येक वेळी यश आपलंचं असतं असं होतं नाही.  कधी कधी अपयशाला सामोरं जावंच लागतं हा पण जर  लोकांनी सांगितलं म्हणून जर का आपण आपले प्रयत्न सोडून दिले तर ते खरं आपलं अपयश असतं, प्रत्येक गोष्ट काहीं ना काही शिकवून जाते. आपण त्या गोष्टींतून काय शिकलो नेमकं काय उमगलं त्यातून यांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे" कारण यशांत वाटेकरी असतात पण मिळालेलं अपयश आपलं असतं त्याला वाटेकरी नसतो.   

कित्येक वेळा असं ही होतं मिळालेलं यश आपल्याला पचवता येतं नाही आणि त्यामुळेच आपण परत अपयशांच्या पायरीवर येऊन बसतो.सहजासहजी यश हाती येतं नाही आणि मिळालेलं यश पचवता ही आलं पाहिजे त्यामुळेचआपल्याला मिळालेल्या अपयशांतून आपण किती भक्कम होयचं आणि पुढे कसं जायचं हे आपण ठरवायचं.

अपयशांतून जातं असताना आपल्याला लोकांचे सल्ले, टोमणे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला समजून घेतलेली माणसं त्यांचं मार्गदर्शन या सगळ्यांची शिदोरी घेऊन त्या यशांच्या उंच शिखरांव पोहचावं लागतं.

 


Comments

Popular posts from this blog

भाडोत्री

शहरांकडील माणसं....

महावारी