परंपरेला छेद देतांना


 आपला देश समृद्ध आहे तो इथल्या इतिहास,सण, समारंभ, आणि अनेक विविध परंपरेमुळे भारतात अनेक रिती-रिवाज पाळल्या जातात. प्रत्येक राज्यात आपले सणवार अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पाळले जातात त्याचे महत्त्व देखील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे ,आपल्या प्रथा परंपरेला आजही तितकचं महत्व दिलं जातं. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी काही वेळेस आपण आपल्या परंपरा रुढी आणि सणवार  संस्कृती यांनाच नावं ठेवण्यात धन्यता मानतो. "हे व्रत वैकल्या सणवार रिती भाती या जुनाट आहेत या सगळ्यांचे आता काय महत्व आणि आम्ही का मानायच्या असे बोलणांरे लोक आहेत आणि मानणांरे सुद्धा. अनिष्ट रुढी आणि परंपरेला विरोध झालाचं पाहिजे पण यांमध्ये आपण आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेलाच छेद देतं नाही ना याचा पण विचार करावाच. 

अनेक पुढारलेल्या घरात बहुतेक सणवांर साजरे करणे बंदचं झालाय जणू उपवास व्रत वैकल्या करणं म्हणजे आपण मांगास जुनाट विचारसरणीचे लोक असा समजंच झालांय.ही परिस्थिती सगळीकडे  सारखीच आहे असं नाही पण या गोष्टींची सुरुवात झाली आहे हे नक्की .

अनेक प्रश्न विचारले जातांत या सणवांरा विषयी जसे की वटपौर्णिमेला स्त्रीनेचं का उपवास करायचा ? मकरसंक्रांतला  बायकांनी का पूजा करायची? या आणि अशा अनेक गोष्टी ज्या गोष्टींकडे विरोधांच बोटं दाखवंल जातं या प्रत्येक सणवार आणि परंपरेला महत्व आहे . खूप आधीपांसून भारतात या गोष्टी पाळल्या जातात आणि साजऱ्या केल्या जातात त्या गोष्टींच महत्व न समजतां या सगळ्याला जुनांट मानून बगल दिली जाते.पण या गोष्टी पूर्णपणे बंद ,करण्यापेक्षा जर नव्या आधुिनक रंगात आपल्याशा केल्या तर आपली परंपरा टिकेल वाढेल आणि पुढील पिढ्यांना ती नव्या ढंगात रंगात मिळेल.

कोणतांही देश हा तिथल्या रितीरिवाज संस्कृती परंपरेने समृद्ध असतो त्याने त्याची ओळख होतं असते .कितीही पुढारलेले देश असुद्या प्रत्येक देशाची स्वतःची अशी प्रथा, सणवार आणि परंपरा असतात जी तिथली लोक अभिमानाने मानतात आणि पुढे ही नेतात त्या गोष्टी कितीही प्रगती झाली तरी सोडत नाहीत या उलट अधिक जोमाने ती इतरांसमोर माडण्यांचा प्रयत्न केला जातो .जेणे करून आपली परंपरा ही जगभर पोहचवून ती इतरांना ही कळावी.आपल्यातील काही लोकं आपल्या संस्कृती परंपरेनेला नावं ठेवून आपल्याच संस्कृतीचा परंपरेचा एक प्रकारे गळा आवळतांत.या गोष्टी जर राहिल्यांच नाहीत तर जशा इतर गोष्टी आपण बाहेरच्या देशांच्या आत्मसांत केल्या आहेत त्याचं प्रमाणे त्यांच्या रिती भाती आणि संस्कृती पण आत्मसांत कराव्या लागतील.

हा या गोष्टी काय लगेच नाही होणार पण ज्या पद्धतीने आपल्याच गोष्टी टाकून द्याला सुरुवात केली आहे त्यामुळे ही वेळ येऊ शकते छोट्या ठिणगी मधूनच मोठी आग होऊन त्या आगीत आपली समृद्ध आणि संपन्न अशी संस्कृती परंपरा जाळून जाऊं  नेई एवढंच आणि या सगळ्या गोष्टी टाळल्या जाण्यांसाठी आपल्या सणवार परंपरेला नव्याने आत्मसात करून जाणून घेऊन तिला पुढारलेल्या विचारणे पुढे नेणे आवश्यक आहे.



Comments

Popular posts from this blog

भाडोत्री

शहरांकडील माणसं....

महावारी